
Image Source:(Internet)
विराट कोहलीने २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणारा वनडे वर्ल्ड कप भारतासाठी आपला शेवटचा विश्वचषक असण्याचे संकेत दिले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी बोलताना कोहलीने वर्ल्ड कप जिंकणे हे आपले अंतिम ध्येय असल्याचे स्पष्ट केले.
कोहली म्हणाला की, वनडे वर्ल्ड कपची तीव्रता इतर कोणत्याही स्पर्धेपेक्षा अधिक असते. संपूर्ण स्पर्धेत सातत्याने सर्वोत्तम कामगिरी करणे हे मोठे आव्हान आहे. भारतासाठी खेळणारा हा आपला शेवटचा वर्ल्ड कप असेल आणि हीच आपली सर्वात मोठी प्रेरणा असल्याचे त्याने सांगितले. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मैदानावर सर्वस्व पणाला लावणार असल्याचेही कोहलीने म्हटले.
दरम्यान, रोहित शर्मानेही पुढील वर्ल्ड कपबाबत उत्सुकता व्यक्त केली. खेळत असताना आपले काम पूर्ण झाले आहे, असा विचार कधीच मनात येत नाही, असे रोहित म्हणाला. वेगवेगळे प्रतिस्पर्धी आणि मैदानांमुळे आयसीसी स्पर्धांमध्ये प्रत्येक वेळी नव्या पद्धतीने तयारी करावी लागते, असेही त्याने स्पष्ट केले.