
Image Source:(Internet)
नागपूर : इंदौरा-दिघोरी फ्लायओव्हर सुरू होऊन अवघे पाच दिवस झाले असतानाच येथे भीषण अपघात झाला. मोठा ताजबाग परिसरात सायकलवरून जात असलेल्या १३ वर्षीय कासिब सिद्दीकी याला भरधाव बुलेटने मागून जोरदार धडक दिली. गंभीर जखमी कासिबचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कासिब हा आपल्या तीन-चार मित्रांसोबत रात्री सायकलवरून फिरण्यासाठी बाहेर पडला होता. मोठा ताजबागजवळ फ्लायओव्हरवरून जात असताना मागून आलेल्या बुलेटने त्याच्या सायकलला धडक दिली. या अपघातात कासिबसह बुलेटस्वार विजय तिडके हे देखील जखमी झाले.
अपघातानंतर नागरिकांनी दोघांनाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. कासिबची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मेडिकल रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलिसांनी तपास सुरू केला. बुलेटस्वार विजय तिडके याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताची पुढील चौकशी सुरू आहे. याबाबत सक्करदरा पोलीस ठाण्याचे PSI चेतन राजपूत यांनी माहिती दिली.