
Image Source:(Internet)
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात तब्बल १ हजार रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीनंतर जीएसटीसह १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ५५ हजार ५३० रुपयांवर आला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा दर महत्त्वाचा ठरला आहे.
दरम्यान, चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. चांदीच्या दरात तब्बल ५ हजार रुपयांची घट झाली असून, जीएसटीसह चांदीचा भाव २ लाख ३९ हजार ९९० रुपयांवर पोहोचला आहे.
गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सोन्या-चांदीच्या दरात झालेली ही घसरण बाजारातील ग्राहकांसाठी दिलासादायक मानली जात आहे. मात्र, सराफ बाजारातील दरांमध्ये दिवसभरात बदल होऊ शकतो.