भेदभावाच्या आरोपावरून शिवराय कुलकर्णी आक्रमक; सुरक्षाव्यवस्थेवर उपस्थित केला सवाल

Image Source:(Internet)
अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. कार्यकर्त्यांना विमानतळ परिसरात रोखण्यात आल्याने हा वाद निर्माण झाला.
पोलिसांकडून भेदभावपूर्ण पद्धतीने वागणूक दिल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला. यानंतर भाजप नेते शिवराय कुलकर्णी यांनी आक्रमक भूमिका घेत, विमानतळावरील सुरक्षा नियम सर्वांसाठी समान आहेत का, असा सवाल उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांच्या आगमनामुळे विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. याचदरम्यान कार्यकर्त्यांना रोखल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोलिसांची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतर नेमका वाद कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे.