भोंदूबाबा अशोक खरातच्या कोठडीत वाढ; पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन

    23-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नाशिक : लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीसह गंभीर आरोप असलेल्या अशोक खरातच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात हिला विशेष न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी ३० सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.

कल्पना खरात हिला १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जामीनपत्रावर जामीन देण्यात आला आहे. मात्र, न्यायालयाने तिच्यावर काही निर्बंध घातले आहेत. पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाता येणार नाही तसेच पासपोर्ट आणि प्रवासाच्या कागदपत्रांबाबत न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावे लागणार आहे.

दरम्यान, अशोक खरातवर अंधश्रद्धा, चमत्कार आणि धार्मिक विधींचे आमिष दाखवून शेकडो लोकांची ४७ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तसेच आश्रमात आलेल्या महिलांचे लैंगिक शोषण केल्याचेही आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि नाशिक पोलिसांकडून सुरू आहे.

ईडीने दाखल केलेल्या सुमारे ३ हजार पानांच्या आरोपपत्रावर न्यायालयात सुनावणी झाली. अशोक खरात याला नाशिक रोड कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. नाशिक, सिन्नर, शिर्डी आणि राहाता परिसरात त्याच्याविरोधात एकूण १७ गुन्हे दाखल असल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे.