
Image Source:(Internet)
नागपूर : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची तारीख अखेर जाहीर झाली आहे. अमरावती, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागातील पाच मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे संबंधित मतदारसंघांमध्ये आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार 23 ऑक्टोबर रोजी मतदान, तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा स्पष्ट झाल्याने इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात होणार असून, विविध पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्याच्या हालचालींनाही वेग येण्याची शक्यता आहे.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदारांमध्येही निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या काळात उमेदवारांची घोषणा, प्रचाराचे नियोजन आणि मतदारांशी संपर्क अभियानाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.