दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार वेळकाढूपणा का करतंय? खासदार बळवंत वानखडेंचा थेट सवाल

    21-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

अमरावती : काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत, दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार वेळकाढूपणा का करत आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. दुष्काळी परिस्थितीवर विरोधकांकडून विशेष अधिवेशनाची मागणीही होत आहे.

सरकारने तातडीने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी वानखडे यांनी केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने दुष्काळ जाहीर केला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ज्याप्रमाणे दिवे लावून उत्सव साजरा करण्यात आला, त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात दिवे लावून आनंदोत्सव साजरा करू, अशी उपरोधिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान, दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही खासदार वानखडे यांनी केली आहे. दरम्यान, दुष्काळसदृश परिस्थितीवर उपाययोजनांसाठी सरकारकडूनही आढावा घेतला जात असल्याचे वृत्त आहे.