सचिन तेंडुलकरांच्या घरी गणरायाला भावपूर्ण निरोप; सानिया-साराचा पारंपरिक लूक चर्चेत

    16-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : क्रिकेटचा दिग्गज सचिन तेंडुलकर यांच्याकडे यंदाही गणरायाचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. गणेशोत्सवाच्या काही दिवसांनंतर तेंडुलकर कुटुंबाने घरातील बाप्पाला साधेपणाने निरोप दिला. सचिन तेंडुलकर यांनी या विसर्जनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर शेअर केला असून, त्यावर चाहत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत.

तेंडुलकर कुटुंबात गणरायाच्या आगमनावेळी सचिन, पत्नी अंजली आणि कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. मात्र, यावेळी सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते सानिया तेंडुलकर आणि सारा तेंडुलकर यांच्या पारंपरिक साडीतील लूकने.

सानिया तेंडुलकरने गुलाबी रंगाची आकर्षक साडी नेसून त्यावर टिकली, हार आणि बांगड्यांनी पारंपरिक साज केला होता. तिने या लूकचा फोटो शेअर करत ‘गणपती रेडी’ असे कॅप्शन दिले. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.

तर सारा तेंडुलकरने हिरव्या रंगाच्या साडीत पारंपरिक लूक केला. गळ्यात दागिने, कानात झुमके आणि केसांमध्ये फुलांचा गजरा असा तिचा लूक लक्षवेधी ठरला. तिने ‘Ganpu season’ असे कॅप्शन देत फोटो शेअर केला. दुसऱ्या पोस्टमध्ये मोदक, आरती, कुटुंबीय, मित्र आणि घरातील बाप्पाच्या उपस्थितीचा आनंद व्यक्त केला.

दरम्यान, सचिन तेंडुलकर यांनी घरातील छोट्या गणेशमूर्तीच्या विसर्जनाचा व्हिडिओ शेअर केला. कुटुंबीय आणि पुरोहितांच्या उपस्थितीत घरातच साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले. यावेळी सचिन यांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ असा भावपूर्ण संदेश दिला.

तेंडुलकर कुटुंबाच्या या साध्या आणि पारंपरिक गणेशोत्सवाची सामाजिक माध्यमांवर चर्चा रंगली आहे. विशेषतः सानिया आणि सारा यांच्या साडीतील पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.