पुण्यात गणरायाच्या चरणी प्रार्थना; नितीन नवीनसह देवेंद्र फडणवीसांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

    16-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पुणे : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी दोन्ही नेत्यांनी गणरायाची आरती करत महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

या दर्शनावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. दगडूशेठ गणपती ट्रस्टचे सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने, अध्यक्ष सुनील रासने तसेच कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य सुजलाम् सुफलाम् व्हावे, राज्यातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर व्हावे आणि जनतेला सुख-समृद्धी लाभावी, असा संकल्प करत गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.