नेपाळमध्ये अडकलेल्या १०६ भाविकांना मोठा दिलासा; पटणाहून नागपूरकडे रवाना

    29-Aug-2026
Total Views |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सुरक्षित परतीची व्यवस्था
Image Source:(Internet)

नागपूर : नेपाळमध्ये अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील १०६ भाविकांच्या सुरक्षित परतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत भाविकांना आवश्यक मदत आणि प्रवासाची व्यवस्था करण्यात आली.

नेपाळमधून भाविकांना सुरक्षितपणे पटणा येथे आणण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्रात परतण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. आज सकाळी ७.३६ वाजता रेल्वे क्रमांक १७६०९ने सर्व १०६ भाविक पटणाहून नागपूरच्या दिशेने रवाना झाले.

संकटाच्या परिस्थितीत शासन आणि प्रशासनाने तातडीने मदत केल्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला. सुरक्षित परतीची व्यवस्था झाल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मदतकार्याशी संबंधित सर्व यंत्रणांचे आभार मानले.

या मदतीमुळे नेपाळमध्ये अडकलेल्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांचा महाराष्ट्राकडे परतीचा प्रवास आता सुरू झाला आहे.