बिहारच्या सिंहेश्वर धाम मंदिरात चेंगराचेंगरी; ४ महिलांसह ६ भाविक जखमी

    24-Aug-2026
Total Views |
 
Singheshwar Dham Temple
 Image Source:(Internet)
 
मधेपुरा : बिहारमधील (Bihar) मधेपुरा येथील प्रसिद्ध सिंहेश्वर धाम मंदिरात सावन महिन्याच्या शेवटच्या सोमवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ गर्दी अचानक अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत चार महिलांसह सहा भाविक जखमी झाले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ६.२५ ते ७ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. गर्दीत काही भाविक खाली पडल्याने त्यांना दुखापत झाली.
 
या घटनेत काही महिला गर्दीत अडकल्या होत्या. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत त्यांना गर्दीतून बाहेर काढले. जखमींमध्ये चार महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. सर्व जखमींना उपचारासाठी मधेपुरा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
घटनेनंतर मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.