
Image Source:(Internet)
पुणे : अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रनके प्राधिकरणाचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. आवश्यक सुधारणा पूर्ण होईपर्यंत हॉटेलने कोणताही अन्न व्यवसाय करू नये, असे निर्देश FDAकडून देण्यात आले आहेत.
राज्यात अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत नगर रोड परिसरातील जुना खराडी जकात नाका, खांदवे नगर, लोहेगाव येथील हॉटेल ‘चुल मटण’ची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या अनुसूचीत नमूद केलेल्या स्वच्छता आणि आरोग्यविषयक निकषांचे पालन होत नसल्याचे FDAच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्यात आलेली नसल्याने हॉटेलविरोधात कठोर कारवाई करण्यात आली.
पुणे विभागात मोठी कारवाई-
दरम्यान, पुणे विभागात 14 ते 17 ऑगस्टदरम्यान तीन आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासण्यांमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आल्याने संबंधित आस्थापनांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान तब्बल 10 लाख 7 हजार 460 रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. तीन आस्थापनांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, सात जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन आस्थापना सील करण्यात आल्या आहेत.
प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहनही अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. त्यामुळे FDAच्या या कारवाईमुळे अन्न व्यवसायातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मुंबईतील सहा हॉटेलवरही कारवाई-
पुण्यासोबतच मुंबईतही FDAने अनेक आस्थापनांवर कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान स्वच्छता, अन्नसाठवणूक, तापमान नियंत्रण आणि देखभाल यामध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने मुंबईतील सहा हॉटेलचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
FDAच्या या सलग कारवायांमुळे अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत नियमांचे पालन न करणाऱ्या हॉटेल आणि आस्थापनांवर प्रशासनाची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा संदेश या कारवायांतून देण्यात आला आहे.