नागपुरात इंस्टाग्रामवर चाकूचा धाक दाखवणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात

    11-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : सोशल मीडियावर चाकू दाखवत दहशत निर्माण करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट-५ पथकाने अटक केली. त्याच्याकडून धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे.

निकेश ऊर्फ निक्या रितेश लिंगायत (१९), रा. बाबा बुद्धनगर, वैशालीनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेचे युनिट-५ पथक १० ऑगस्ट रोजी फरार आरोपी, अभिलेखावरील गुन्हेगार तसेच बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्यांचा शोध घेत होते.

याचदरम्यान, काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर चाकू दाखवून धमकावणाऱ्या एका तरुणाची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने त्याचा शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपी पवन बुद्ध विहार परिसरात चाकूसह आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्याकडून धारदार चाकू जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पाचपावली पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीसह जप्त केलेले शस्त्र पुढील तपासासाठी पाचपावली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.