सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा, जाणून घ्या आजचे भाव

    08-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मंगळवारी मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे दागिने खरेदीची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

अमेरिका आणि इराणमधील वाढलेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्या होत्या. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही झाला होता. मात्र, आजच्या व्यवहारात दर खाली आल्याचे दिसून आले.

जळगाव सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याच्या दरात तब्बल 1,500 रुपयांची घट झाली आहे. तसेच एक किलो चांदी 6,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

आज (8 जुलै) जीएसटीसह 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,48,320 रुपये, तर एक किलो चांदीचा दर 2,36,900 रुपये इतका नोंदविण्यात आला आहे.

सराफ व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरची स्थिती आणि जागतिक आर्थिक वातावरणाचा परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवर होत असून, त्यामुळे दरांमध्ये चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरेदीपूर्वी ग्राहकांनी ताजे बाजारभाव तपासूनच व्यवहार करावा, असा सल्ला दिला जात आहे.