गोंदियात चक्रीवादळाचा कहर; वडेगाव बंध्या गावात ८ जण जखमी, अनेक घरांचे मोठे नुकसान

    30-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील वडेगाव बंध्या येथे अचानक आलेल्या चक्रीवादळाने मोठे नुकसान केले आहे. या वादळात अनेक घरांची छते उडाली, झाडे आणि वीज खांब कोसळले, तर उडणारे पत्रे आणि ढिगाऱ्याखाली अडकल्याने ८ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून तातडीने मदतीची मागणी करण्यात येत आहे.

गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील वडेगाव बंध्या परिसरात अचानक आलेल्या भीषण चक्रीवादळाने गावात मोठा कहर माजवला. वादळाच्या प्रचंड वेगामुळे अनेक घरांवरील पत्रे आणि छते उडून गेली, तर अनेक झाडे व वीज खांब उन्मळून पडल्याने गावातील जनजीवन विस्कळीत झाले.

या नैसर्गिक आपत्तीत उडणारे पत्रे लागल्याने तसेच ढिगाऱ्याखाली अडकल्याने ८ नागरिक जखमी झाले. ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

चक्रीवादळामुळे अनेक कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून काही कुटुंबांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, नुकसानग्रस्त भागाचा तातडीने पंचनामा करून बाधितांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.