
Image Source:(Internet)
बुलढाणा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी इथेनॉल विषयावरून केंद्र सरकारवर निशाणा साधत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी केली. बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी इथेनॉल धोरणासंदर्भातील प्रश्नांवर सरकारने मौन न बाळगता स्पष्ट भूमिका घ्यावी, असे म्हटले.
सपकाळ यांच्या मते, इथेनॉल प्रकरणात अनेक शंका उपस्थित होत असून त्यांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती जनतेसमोर यावी आणि जबाबदारी निश्चित व्हावी, अशी त्यांची भूमिका आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पुन्हा केली.
यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत सरकार जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी राजकीय भूमिका घेत असल्याचा आरोप केला. इथेनॉलसारख्या महत्त्वाच्या विषयावर सरकारने पारदर्शक भूमिका घेऊन सर्व शंकांचे निरसन करावे, असेही सपकाळ यांनी सांगितले.