विद्यार्थ्यांच्या संघर्षाला मोठे यश; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिला राजीनामा!

    25-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर देशभरातून उभ्या राहिलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. या घडामोडीनंतर आंदोलनकर्त्यांनी याला विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि सातत्यपूर्ण संघर्षाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनेक दिवसांपासून सीजेपीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. "शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींना जबाबदार असलेल्या नेतृत्वात बदल झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही," अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी कायम ठेवली होती.

या आंदोलनादरम्यान सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी प्रकृती अस्वस्थ असतानाही आंदोलनाची धुरा सांभाळली. हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे आंदोलनाने राष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेतले. अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याने आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागणीची पूर्तता झाल्याचे सांगितले जात आहे.

राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा करत, "हा विजय कोणत्याही एका संघटनेचा नाही, तर देशातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या संघर्षाचा आहे," अशी भावना व्यक्त केली.