
Image Source:(Internet
)
मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम पुन्हा एकदा आपल्या रिअल इस्टेट गुंतवणुकीमुळे चर्चेत आला आहे. जॉनने मुंबईतील बांद्रा पश्चिम येथील सेंट मार्टिन रोड परिसरात तब्बल ८४ कोटी रुपयांचा आलिशान बंगला खरेदी केला असून, या व्यवहारासाठी ५.०४ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मालमत्ता सुमारे १,०१७.६० चौरस मीटर क्षेत्रात पसरलेली आहे. मुख्य बंगल्याचे बांधकाम १९३.१२ चौरस मीटर असून, त्यामागे ३१.५० मीटरचा स्वतंत्र आऊटहाऊस देखील आहे. या व्यवहाराची अधिकृत नोंदणी १४ जुलै २०२६ रोजी करण्यात आली.
जॉन अब्राहमची ही पहिली मोठी रिअल इस्टेट गुंतवणूक नाही. यापूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये त्याने मुंबईतील खार परिसरात ७०.८३ कोटी रुपयांचे प्रीमियम अपार्टमेंट खरेदी केले होते. गेल्या काही वर्षांत मुंबईतील प्रमुख भागांमध्ये मालमत्ता खरेदीवर त्याने विशेष भर दिला आहे.
अभिनेता म्हणून यशस्वी कारकीर्द घडवतानाच जॉनने विविध व्यवसाय आणि स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक केली आहे. त्यामुळे तो बॉलिवूडमधील यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक मानला जातो. अलीकडच्या काळात रणबीर कपूर, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांसारख्या अनेक कलाकारांनीही मोठ्या प्रमाणावर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे.