Image Source:(Internet)
नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान 'कॉकरोच जनता पक्ष'चे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके (Abhijit Deepke) यांनी जंतर-मंतर येथे सुरू असलेले आपले उपोषण अचानक मागे घेतले. त्यांच्या उपोषणाच्या समाप्तीनंतरही पक्षाने संसदेकडे काढलेला मोर्चा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आंदोलनादरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क होत्या. शास्त्री भवन परिसरात आंदोलकांना रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, अभिजित दीपके यांच्या उपोषण सोडण्याच्या निर्णयानंतर आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.