मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; उभ्या डंपरवर क्रेटा कार आदळली, तीन ठार

    15-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा परिसरात बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईकडे परतणाऱ्या एका कुटुंबाच्या क्रेटा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला जोरदार धडक दिल्याने दोन महिलांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात लांजा येथील विश्रामगृहाजवळ घडला. धडक इतकी प्रचंड होती की, कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अग्रिपाडा परिसरातील एक कुटुंब गोव्याला पर्यटनासाठी गेले होते. सहल आटोपून मुंबईकडे परतत असताना त्यांच्या वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने किंवा अन्य कारणामुळे कार थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरवर जाऊन आदळली.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळताच रत्नागिरी पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. मृतांची ओळख पटविण्याचे आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


कॅगच्या या अहवालामुळे सामाजिक न्याय विभागाच्या अनुदानित वसतिगृहांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणात पुढील कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.