तामिळनाडू राजकारणात मोठा बदल; थलपती विजय यांच्या टीव्हीकेकडे बहुमताचा मार्ग खुला!

    08-May-2026
Total Views |
 
Thalapathy Vijay
 Image Source:(Internet)
 
तामिळनाडूतील (Tamil Nadu) राजकीय घडामोडींनी पुन्हा एकदा वेग घेतला असून राज्यातील सत्ता समीकरणात मोठा बदल झाल्याचे चित्र दिसत आहे. अभिनेता-राजकारणी थलपती विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेट्री कळघम (TVK) पक्षाने बहुमताचा आवश्यक आकडा गाठल्याची माहिती समोर येत आहे.
 
विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेने 108 जागांवर विजय मिळवत राज्यातील मोठा पक्ष म्हणून उदय घेतला होता. मात्र 118 जागांचे बहुमत नसल्यामुळे सरकार स्थापनेचा पेच निर्माण झाला होता. या टप्प्यावर काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे पक्षाची संख्या 112 पर्यंत पोहोचली, तरीही पूर्ण बहुमतासाठी आवश्यक आकडा अद्याप अपुरा राहिला होता.
 
दरम्यान, राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करताना टीव्हीकेकडून 118 आमदारांच्या समर्थनाचे पत्र सादर करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र सुरुवातीला केवळ 112 आमदारांचेच समर्थन असल्याने परिस्थिती अनिश्चित राहिली.
 
आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, सीपीआय आणि सीपीएम पक्षांनी टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केला आहे. या नव्या घडामोडीनंतर पक्षाचा बहुमताचा आकडा 118 पर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
 
या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन थलपती विजय मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात पुढील काही तास निर्णायक ठरणार आहेत.