कोलकात्यात अमित शाहांनी केली घोषणा

Image Source:(Internet)
कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला असून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली असून केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांनी कोलकात्यात याची अधिकृत घोषणा केली. 9 मे रोजी ऐतिहासिक परेड ग्राउंडवर ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यामुळे पश्चिम बंगालमध्ये प्रथमच भाजपची सत्ता स्थापन होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपने जबरदस्त मुसंडी मारत 207 जागांवर विजय मिळवला. तृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात घुसून भाजपने सत्ता हस्तगत केली. या संपूर्ण निवडणुकीत शुभेंदू अधिकारी हे भाजपचे सर्वात प्रभावी चेहरा ठरले. त्यांनी भवानीपूर मतदारसंघातून Mamata Banerjee यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. याआधी नंदीग्राममध्येही त्यांनी ममता बॅनर्जी यांना धक्का दिला होता.
दरम्यान, कोलकात्यातील परेड ग्राउंडवर होणाऱ्या शपथविधीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान Narendra Modi यांच्यासह भाजप आणि एनडीएतील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
विधायक दलाचा नेता म्हणून निवड झाल्यानंतर शुभेंदू अधिकारी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर करणार आहेत. बंगालमध्ये भाजपच्या नव्या पर्वाची आता अधिकृत सुरुवात होत असल्याचे चित्र आहे.