सुनेत्रा पवार आघाडीवर असताना बारामतीत ‘बोगस सह्यां’चा मोठा स्फोट; २२ उमेदवारांवर कारवाईचे संकेत

    04-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतमोजणीच्या नवव्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांनी तब्बल ७८ हजारांहून अधिक मतांची भक्कम आघाडी घेत विजय जवळपास निश्चित केला आहे. मात्र, या विजयी वातावरणातच निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा गंभीर प्रकार समोर आला आहे.

सुनेत्रा पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या २२ उमेदवारांच्या अर्जांवरील सूचक आणि अनुमोदकांच्या सह्या बनावट असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना आवश्यक असलेल्या सह्यांमध्ये फेरफार झाल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासन सतर्क झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित उमेदवारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे बारामतीतील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, विजयाच्या उंबरठ्यावर असतानाच सुनेत्रा पवार यांनी अत्यंत संयमित भूमिका घेत कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. त्यांनी हा विजय अजित पवार यांच्या स्मृतींना अर्पण करत, कोणत्याही प्रकारचा जल्लोष, मिरवणुका किंवा गुलाल उधळणे टाळण्याचे आवाहन केले.

“हा शेवट नाही, नव्या बारामतीच्या उभारणीची ही सुरुवात आहे,” असे सांगत त्यांनी बारामतीकरांचे आभार मानले.