कच्च्या तेलाच्या दरवाढीचा फटका; तेल कंपन्यांवर रोज 550 कोटींचा भार, पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाहीर

    28-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचा परिणाम आता भारताच्या इंधन क्षेत्रावरही दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने वाढत असताना, त्याचा संपूर्ण भार नागरिकांवर पडू नये म्हणून सरकारी तेल कंपन्या मोठा आर्थिक ताण सहन करत असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

सरकारी माहितीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांना सध्या दररोज सुमारे 550 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. वाढत्या कच्च्या तेलाच्या किंमती, पुरवठा साखळीतील अडथळे आणि जागतिक तणावामुळे देशातील ऊर्जा व्यवस्थेवर दबाव वाढत असल्याचे चित्र आहे.

गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात झालेल्या वाढीनंतर देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही जवळपास 8 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मात्र बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या नव्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनधारकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

आजचे प्रमुख शहरांतील इंधन दर-
दिल्ली – पेट्रोल 102.12 रुपये, डिझेल 95.20 रुपये
मुंबई – पेट्रोल 111.21 रुपये, डिझेल 97.83 रुपये
कोलकाता – पेट्रोल 113.51 रुपये, डिझेल 99.82 रुपये
चेन्नई – पेट्रोल 107.74 रुपये, डिझेल 99.55 रुपये
बेंगळुरू – पेट्रोल 110.93 रुपये, डिझेल 98.80 रुपये

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील दर-

मुंबई – पेट्रोल 111.21 रुपये, डिझेल 97.83 रुपये
पुणे – पेट्रोल 112.04 रुपये, डिझेल 98.68 रुपये
नागपूर – पेट्रोल 111.80 रुपये, डिझेल 98.48 रुपये
नाशिक – पेट्रोल 112.44 रुपये, डिझेल 99.07 रुपये
कोल्हापूर – पेट्रोल 112.57 रुपये, डिझेल 99.23 रुपये
अमरावती – पेट्रोल 112.89 रुपये, डिझेल 99.54 रुपये
ठाणे – पेट्रोल 111.38 रुपये, डिझेल 98.00 रुपये

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती पाहता येत्या काही दिवसांत इंधन दरांमध्ये पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.