पेट्रोल-डिझेलबाबत अफवांना बळी पडू नका; राज्यात पुरेसा साठा असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

    20-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या चर्चांमुळे राज्यातील अनेक भागांत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर इंधन खरेदी केली जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. राज्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणतीही टंचाई नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र शासनाकडे मोठ्या प्रमाणात राखीव इंधनसाठा आहे आणि राज्यातही पुरवठा नियमितपणे सुरू आहे. मात्र, काही अफवा आणि चुकीच्या माहितींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ताण निर्माण होऊ शकतो. याचा अर्थ इंधन संपत आहे असा होत नाही,” असे फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले. “भीतीपोटी जादा इंधन खरेदी केल्यास पुरवठा व्यवस्थेवर अनावश्यक दबाव येतो. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करा,” असे ते म्हणाले.

दरम्यान, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही राज्यात सुमारे महिनाभर पुरेल एवढा इंधनसाठा उपलब्ध असल्याची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावामुळे काही प्रमाणात पुरवठा व्यवस्थेवर परिणाम होत असला तरी महाराष्ट्रात नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.