
Image Source:(Internet)
रोम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटली दौऱ्यातील एक खास क्षण सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भारतातील प्रसिद्ध ‘मेलोडी’ टॉफी भेट दिली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.
मेलोनी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करत मोदींचे आभार मानले. “गिफ्टसाठी धन्यवाद,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. यानंतर सोशल मीडियावर “मेलोडी” हा शब्द पुन्हा ट्रेंडमध्ये आला.
विशेष म्हणजे, ‘मोदी’ आणि ‘मेलोनी’ यांच्या नावांचा संदर्भ घेत तयार झालेला “मेलोडी” हा मीम याआधीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला होता. मोदींनी दिलेल्या या गिफ्टमुळे त्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
मोदी आणि मेलोनी यांनी रोममधील ऐतिहासिक Colosseum येथेही भेट दिली. दोन्ही नेत्यांमध्ये विविध आंतरराष्ट्रीय विषयांसह भारत-इटली संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा झाली.
भारत आणि इटली यांच्यातील सहकार्य सध्या व्यापार, संरक्षण, ऊर्जा, विज्ञान-तंत्रज्ञान आणि गुंतवणूक अशा अनेक क्षेत्रांत वाढताना दिसत आहे.