ठाण्यात शिवसेना बळकट होताच उबाठा अस्वस्थ; खासदार ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल

    02-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

ठाणे : बच्चू कडू यांच्यावरील टीकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांनी उबाठा गटावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

शिवसेनेची वाढती ताकद पाहून उबाठा गट अस्वस्थ झाला असल्याचा आरोप करत, “वास्तव स्वीकारता न आल्यामुळेच त्यांच्यात चिडचिड आणि जळफळाट दिसून येतो,” असा टोला वाघमारे यांनी लगावला.

बच्चू कडू यांच्या संदर्भात बोलताना त्यांनी उबाठा गटाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मंत्रिमंडळात असताना बच्चू कडू योग्य वाटत होते, पण शिवसेनेत आल्यानंतरच त्यांच्यात दोष दिसू लागले, हे नक्कीच आश्चर्यकारक आहे,” असा पलटवार त्यांनी केला.

यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका करत, “स्वतःच्या पक्षातील घडामोडींचीही माहिती नसलेल्या व्यक्तींच्या वक्तव्याला काहीही महत्त्व नाही,” असे म्हटले.

तसेच उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीतून माघार का घेतली, याबाबत आधी उत्तर द्यावे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.