Image Source:(Internet)
नागपूर :
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजने (Ladki Bhaeen scheme) अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही काही महिलांच्या खात्यात हप्ता जमा न झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असला तरी काळजी करण्याचे कारण नाही. महिलांनी ‘नारीशक्ती दूत’ अॅपवर लॉगिन करून आपल्या अर्जाची स्थिती तपासावी. त्यात अर्ज मंजूर, प्रलंबित किंवा नाकारलेला आहे का याची माहिती मिळू शकते.
तसेच, संबंधित जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात संपर्क साधून हप्ता रखडण्यामागील कारण जाणून घेता येईल.
दरम्यान, कोणतीही अडचण असल्यास 181 या टोल-फ्री हेल्पलाईनवर तक्रार नोंदवता येते. येथे प्रशिक्षित कर्मचारी महिलांच्या शंकांचे निरसन करतात.
महत्त्वाचे म्हणजे, ई-केवायसी दुरुस्तीसाठीची मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आली असून, लाभार्थ्यांनी या कालावधीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.