
Image Source:(Internet)
अमरावती : अमरावती-वरूड रस्त्यावर घडलेल्या भीषण अपघातात नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहे.
माहितीनुसार, खैरी गावातील विनायक नगर येथील समाधान नाने हे आपल्या कुटुंबीयांसह चारचाकी वाहनाने लग्न समारंभासाठी अमरावतीकडे निघाले होते. सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास वरूडजवळ त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला.
या दुर्घटनेत समाधान नाने (६०), त्यांचा मुलगा गोपाल नाने (३४), सुना किरण नाने आणि नात दीया (३) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दीपक नाने हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघात कशामुळे झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू असून या घटनेमुळे खैरी गावासह संपूर्ण परिसरात शोकसागर उसळला आहे.