आप’वर विश्वासघाताचा ठपका; भाजपमध्ये येणाऱ्या खासदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्वागत

    25-Apr-2026
Total Views |

मुंबई :आम आदमी पार्टी मधील राज्यसभा खासदारांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आप’वर जोरदार टीका केली आहे. सत्तेत आल्यानंतर पक्षाने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे लोकांचा विश्वास डळमळीत झाल्याचे त्यांनी म्हटले.

फडणवीस यांच्या मते, भ्रष्टाचारविरोधी चळवळीमधून उभा राहिलेला ‘आप’ पक्ष हळूहळू आपल्या मूलभूत विचारांपासून दूर गेला. परिणामी, पक्षातील अनेक नेते असमाधानी झाले आणि त्यांनी बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारला.

“मोठ्या अपेक्षा निर्माण करून सत्तेत आलेल्या ‘आप’ने त्या पूर्ण करण्यात अपयश आले. त्यामुळेच पक्षातील प्रमुख नेते आता त्यांच्यापासून दूर जात आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्यांचे स्वागत करताना त्यांनी सांगितले की, देशात स्थिरता आणि विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देणाऱ्या पर्यायाकडे लोकांचा कल वाढत आहे. भाजपच्या धोरणांमुळेच इतर पक्षांतील नेते आकर्षित होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.