आपमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; राघव चड्ढा यांच्यासह नेत्यांचा भाजपकडे कल

    24-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीमध्ये मोठी राजकीय घडामोड समोर आली असून पक्षात फूट पडल्याचे चित्र आहे. पक्षाचे प्रमुख नेते राघव चड्ढा यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अशोक मित्तल, संदीप पाठक आणि स्वाती मालिवाल यांनीही आप पक्षाला निरोप दिला आहे.

राघव चड्ढा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “गेल्या काही वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले. जनतेनेही या नेतृत्वावर सातत्याने विश्वास दाखवला आहे. त्यामुळे देशहित लक्षात घेऊन आम्ही भाजपसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.”

या निर्णयामुळे आप पक्षाला मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता असून, आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची चर्चा रंगली आहे.