गंगा म्हणजे बंगालचा आत्मा; हुगळी नदीत पंतप्रधान मोदींचा नौकाविहार

    24-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथील हुगळी नदीत नौकाविहार करत गंगा मातेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी त्यांनी नावाडी आणि सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. गंगा ही प्रत्येक बंगालीच्या हृदयात विशेष स्थान राखून असल्याचे सांगत, “गंगा म्हणजे बंगालचा आत्मा आहे,” असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, गंगेच्या पवित्र पाण्यात संपूर्ण संस्कृतीचा कालातीत आत्मा सामावलेला आहे. “आज सकाळी हुगळीच्या काठावर काही वेळ घालवताना गंगा मातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली,” असेही त्यांनी लिहिले.

या नौकाविहारादरम्यान त्यांनी छायाचित्रणाचाही आनंद घेतला. विद्यासागर सेतू आणि हावडा ब्रिज यांचे जवळून फोटो त्यांनी काढले. या क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी राज्याच्या दौऱ्यावर असून, दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी ते कोलकात्यात दाखल झाले आहेत. आज ते दमदम आणि जादवपूर येथे प्रचारसभा घेणार आहेत.