
Image Source:(Internet)
बारामती: विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून, या दिवशी मतदारांना आपला हक्क बजावता यावा यासाठी प्रशासनाने सवेतन सुट्टी जाहीर केली आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मतदानाच्या दिवशी मतदारसंघातील सर्व व्यापारी आस्थापना, उद्योग, खासगी कंपन्या, आयटी उद्याने, मॉल्स तसेच दुकाने येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास, अपवादात्मक परिस्थितीत कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान २ ते ३ तासांची सवलत देणे आवश्यक राहणार आहे. हा नियम बारामती मतदारसंघातील तसेच त्या मतदारसंघाचे मतदार असलेल्या आणि कामानिमित्त बाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही लागू राहणार आहे.
दरम्यान, कोणत्याही आस्थापनेने कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी नाकारल्यास किंवा त्यांच्या वेतनात कपात केल्यास, संबंधितांवर लोकप्रतिनिधी कायदा तसेच कामगार कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
सर्व आस्थापनांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.