सोनं स्वस्त! १० ग्रॅमच्या दरात तब्बल ४,००० ची घसरण; चांदीही कोसळली

    02-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)
जळगाव : गेल्या काही दिवसांत वाढलेल्या सोन्या-चांदीच्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली होती. मात्र, आजच्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मिडल ईस्टमधील तणावामुळे वाढलेले दर आता खाली आले असून बाजारात पुन्हा स्वस्ताईचे संकेत दिसू लागले आहेत.

२ एप्रिल रोजी जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात थेट ४ हजार रुपयांची घट नोंदवण्यात आली. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीसह सुमारे १ लाख ५० हजार ३८० रुपयांपर्यंत खाली आला आहे.

चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळाली असून, तब्बल १५ हजार रुपयांनी दर कमी झाले आहेत. सध्या चांदीचा भाव २ लाख ४३ हजार ८० रुपयांवर पोहोचला आहे. मागील काही दिवसांत चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत होती, मात्र आता बाजाराने यू-टर्न घेतल्याचे चित्र आहे.

या घसरणीमुळे लग्नसराईच्या हंगामात खरेदी करणाऱ्यांसाठी ही संधी मानली जात असून, बाजारात पुन्हा ग्राहकांची गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.