रत्नागिरीत भीषण अपघात; मुंबई-गोवा महामार्गावर दोन ट्रक आमनेसामने धडकले, चालकाचा मृत्यू

    17-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

रत्नागिरी : जिल्ह्यातील लांजा तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी भीषण अपघाताची घटना घडली. वाटुळ-दाभोळे परिसरात दोन ट्रक आमनेसामने धडकल्याने एका चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात इतका तीव्र होता की एका ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने दोन्ही जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेनंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.