नाशिकमध्ये ‘कॉर्पोरेट जिहाद’च्या निषेधार्थ बाईक रॅली!

    16-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नाशिक : शहरातील TCS कंपनीशी संबंधित कथित ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिकांनी सहभाग घेत सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

ही रॅली नाशिकमधील TCS कंपनीपासून सुरू होत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आली. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याऐवजी आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच निवेदन अर्पण करत आपला निषेध नोंदवला.

या वेळी आयोजकांनी जिहादी प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली. संपूर्ण रॅलीदरम्यान घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही केली.