‘अक्षय कुमारचा खरा चेहरा समोर?’ लारा दत्ताच्या विधानाने चर्चांना उधाण

    11-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : अभिनेता अक्षय कुमार याच्याबद्दल अभिनेत्री लारा दत्ता हिने केलेल्या वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. इंडस्ट्रीतील ‘मुलींचा गैरफायदा’ या संवेदनशील विषयावर बोलताना लाराने अक्षय कुमारची एक सकारात्मक आणि वेगळी बाजू उघड केली आहे.

लारा दत्ता आणि प्रियांका चोप्रा यांनी 2003 साली प्रदर्शित झालेल्या अंदाज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्या काळात नवोदित अभिनेत्रींसोबत गैरवर्तन किंवा गैरफायदा घेतल्याच्या चर्चा वारंवार समोर येत होत्या. अशा वातावरणात करिअरची सुरुवात करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत होता.

एका मुलाखतीत लारा दत्ता म्हणाली, “मी आणि प्रियांका दोघीही खूप लहान वयात इंडस्ट्रीत आलो होतो. आमच्याकडे कोणताही गॉडफादर नव्हता. पण अशा वेळी अक्षय कुमारने आमचा गैरफायदा घेण्याऐवजी मोठ्या भावासारखी साथ दिली.”

ती पुढे म्हणाली, “नवीन असताना स्वतःला सुरक्षित ठेवणं कठीण असतं. मात्र, अक्षयने कधीच आमच्या अनुभवाच्या कमतरतेचा फायदा घेतला नाही. उलट, सेटवरचं वातावरण सुरक्षित आणि सन्मानजनक राहील याची तो काळजी घेत असे.”

‘अंदाज’ या चित्रपटामुळे लारा दत्ताला मोठी ओळख मिळाली होती. या चित्रपटातील अभिनयासाठी तिला ‘बेस्ट फीमेल डेब्यू’चा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता, ज्यामुळे तिच्या करिअरला मोठी गती मिळाली.

दरम्यान, लारा दत्ता लवकरच ‘रामायण’ आणि ‘वेलकम टू द जंगल’ या आगामी चित्रपटांमध्ये झळकणार असून ती सोशल मीडियावरही सक्रिय राहून चाहत्यांशी संवाद साधत असते.