अर्थसंकल्प आज सादर होणार; दुपारी २ वाजता मोठ्या घोषणांकडे राज्याचे लक्ष

    06-Mar-2026
Total Views |
 
CM Fadnavis
 Image Source:(Internet)
मुंबई :
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (६ मार्च) राज्याचा महत्त्वाचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस आज दुपारी २ वाजता महाराष्ट्र विधिमंडळ येथे राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.
 
या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून शेती, पायाभूत सुविधा, उद्योग, रोजगार आणि सामाजिक योजनांबाबत मोठ्या घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागाई, शेतकरी मदत, तसेच विकास प्रकल्पांसाठी अतिरिक्त निधी देण्यात येणार का, याकडेही नागरिकांचे लक्ष आहे.
 
दरम्यान, अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करण्यात आला असून त्यानुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात ७.९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) ३१ टक्के वाट्यासह महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
 
आज सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पातून राज्याच्या विकासासाठी कोणते नवे निर्णय आणि योजना जाहीर होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.