अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा हिशोब नाही, तर...; मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत

    06-Mar-2026
Total Views |
 
CM Fadnavis
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis) यांनी सोशल मीडियावरून अर्थसंकल्पाच्या महत्त्वाबाबत आपले मत व्यक्त केले. अर्थसंकल्प हा फक्त आकडेवारीचा दस्तऐवज नसून राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या भविष्यास दिशा देणारा महत्त्वाचा आराखडा असतो, असे त्यांनी नमूद केले.
 
ट्विटमधून बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, तरुणांच्या आकांक्षा, ज्येष्ठ नागरिकांच्या अपेक्षा तसेच शेतकरी, कामगार, नोकरदार आणि उद्योगजगत या सर्व घटकांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागलेले असते. त्यामुळे अर्थसंकल्प फक्त ऐकून घेण्यापेक्षा त्यामागील धोरणे आणि उद्दिष्टे समजून घेणेही तेवढेच गरजेचे आहे.
 
यासोबतच अर्थसंकल्प सर्वसामान्यांना सोप्या भाषेत समजावा यासाठी आपण लिहिलेले पुस्तक वाचण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. उद्या सादर होणारा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाला नवे बळ देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करत नागरिकांनी त्याची तयारी आणि समज आजपासूनच सुरू करावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.