भंडाऱ्यात काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांचा कारचा भीषण अपघात

    30-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

भंडारा: भंडारा जिल्ह्यात सोमवारी पहाटे एक गंभीर अपघात घडला असून काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला ट्रकने धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात पडोळे यांना किरकोळ दुखापत झाली असली तरी ते सध्या सुरक्षित आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, खासदार पडोळे हे आपल्या सहकाऱ्यांसह नागपूर विमानतळाकडे जात होते. दिल्लीतील अधिवेशनासाठी ते रवाना झाले असताना मार्गात अचानक ट्रकने त्यांच्या फॉर्च्युनर गाडीला जोरदार धडक दिली.

या धडकेत गाडीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने प्रशासनाच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.