डोंबिवलीत शिक्षिकेला अश्लील संदेश; विश्वस्ताच्या मुलाला अटक

    27-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

डोंबिवली : येथील एका शाळेत काम करणाऱ्या शिक्षिकेला अश्लील संदेश पाठवून त्रास दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शाळेचे विश्वस्त शिवा अय्यर यांचा मुलगा सरवणा अय्यर हा गेल्या काही महिन्यांपासून संबंधित शिक्षिकेला मोबाईलवर अश्लील संदेश पाठवत होता. त्यामुळे शिक्षिकेला मानसिक त्रास सहन करावा लागत होता.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेनंतर स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाविरोधात आंदोलन करत कडक कारवाईची मागणी केली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. दरम्यान, आरोपीचे वडील शिवा अय्यर यांनीही “चूक झाली असेल तर कायद्यानुसार शिक्षा व्हावी,” अशी भूमिका मांडली आहे.