उद्धव ठाकरेंनीच शिंदेंना घडवलं,अनेक जबाबदाऱ्या दिल्या;संजय राऊतांचा टोला

    25-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच विधानपरिषदेचा औपचारिक निरोप घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून त्यांनी ठाकरेंच्या कार्याचा गौरव केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. राज्याच्या प्रगतीत ठाकरेंचा वाटा महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या घडामोडींवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना शिंदेंच्या वक्तव्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांनी म्हटले की, अशा प्रसंगी कौतुक करणे हा राजकीय शिष्टाचाराचा भाग असतो, मात्र वास्तव विसरून चालणार नाही.

राऊत पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांना राजकारणात संधी देत त्यांना विविध महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी दिली. त्यांच्या नेतृत्वाखालीच शिंदेंची राजकीय वाटचाल घडली, असे त्यांनी स्पष्ट केले.

आज शिंदे ज्या स्थानावर आहेत, त्यामागे ठाकरेंचे मोठे योगदान असल्याचा पुनरुच्चार करत राऊत यांनी कृतज्ञतेची भावना असणे अपेक्षित असल्याचे सूचित केले. सध्याच्या सत्तास्थानी पोहोचण्यातही ठाकरेंचा मोठा वाटा असल्याचा अप्रत्यक्ष टोला त्यांनी यावेळी लगावला.