
Image Source:(Internet)
मुंबई : रमजानच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानमध्ये घडलेल्या एका गंभीर घटनेने जागतिक स्तरावर चिंता वाढवली आहे. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक देशांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतनेही या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे.
हल्ल्याची माहिती-
माहितीनुसार, पाकिस्तानने अफगाणिस्तानातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी हवाई हल्ले केले. या भागांत दहशतवादी लपले असल्याचा संशय घेत ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, या हल्ल्यांमध्ये एका रुग्णालयालाही फटका बसल्याचे समोर आले आहे.
या भीषण घटनेत 400 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर संबंधित इमारतींना आग लागली आणि परिसरात घबराट पसरली. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये जळणाऱ्या इमारती आणि मदतीसाठी धावणारे लोक दिसत आहेत.
या घटनेनंतर अफगाणिस्तानात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून सरकारने पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे.
भारताची प्रतिक्रिया-
काबूल परिसरातील या घटनेवर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. नागरिकांवर होणारे हल्ले अमानवीय असल्याचे सांगत भारताने या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.या घटनेमुळे प्रादेशिक तणाव वाढण्याची शक्यता असून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष आता या प्रकरणाकडे लागले आहे.