नागपूर : नागपूर महानगरपालिकेने (मनपा) आर्थिक वर्ष 2026–27 साठी 5,541.31 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला असून शहरातील मूलभूत नागरी सुविधांच्या बळकटीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. मनपा आयुक्त विपिन इटनकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पाची माहिती दिली.
इटनकर यांनी सांगितले की, शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, स्ट्रीट लाईट, कचरा व्यवस्थापन आणि इतर दैनंदिन नागरी सेवा अधिक सक्षम करण्यावर या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे.
अर्थसंकल्पाची रचना-
हा अर्थसंकल्प महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या तरतुदीनुसार तयार करण्यात आला आहे.
भाग ‘अ’ मध्ये मनपाचे सर्वसाधारण उत्पन्न व खर्च समाविष्ट आहेत.भाग ‘क’ मध्ये पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन विभागाचा समावेश करण्यात आला आहे.
अपेक्षित उत्पन्न-
मनपाला 2026–27 या आर्थिक वर्षात एकूण 5,541.31 कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे.
तर चालू 2025–26 आर्थिक वर्षात अंदाजे 4,702.75 कोटींचे उत्पन्न अपेक्षित असून यासोबत 698.87 कोटींची शिल्लक रक्कम उपलब्ध आहे.
खर्चाचा आराखडा-
शहर विकास आणि नागरी सेवांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
2026–27 साठी एकूण प्रस्तावित खर्च 5,840.65 कोटी इतका ठेवण्यात आला आहे. यामध्ये सामान्य नागरी कामे तसेच पाणीपुरवठा व सांडपाणी प्रकल्पांचा समावेश आहे.
शहर बस सेवेसाठी निधी-
नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत ठेवण्यासाठीही निधी राखून ठेवण्यात आला आहे.
2025–26 साठी 170 कोटी
2026–27 साठी 160 कोटी प्रस्तावित
उत्पन्नाचे स्रोत-
एकूण अर्थसंकल्पातील 3,889.48 कोटी रुपये मनपाच्या स्वतःच्या उत्पन्नातून येणार आहेत.
1,651.83 कोटी राज्य व केंद्र सरकारच्या मदतीतून मिळणार आहेत.
विकासकामांवर भर-
मनपा आयुक्तांच्या मते, या अर्थसंकल्पात रस्ते, स्ट्रीट लाईट, शाळा, रुग्णालये, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था आणि कचरा संकलन यांसारख्या मूलभूत सेवांवर भर देण्यात आला आहे. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकल्प राबविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे