तरुणांनो तयारीला लागा; पोलिस भरतीस प्रारंभ; १६ फेब्रुवारीपासून मैदानी चाचण्या

    07-Feb-2026
Total Views |
 
Police recruitment
 Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यातील पोलिस भरती (Police recruitment) प्रक्रियेला १६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या भरतीअंतर्गत मैदानी व शारीरिक चाचण्या घेतल्या जाणार असून, पोलिस प्रशासनाने त्यासाठी तयारी पूर्ण केली आहे.
 
पुणे शहर पोलिस दलासाठी एकूण ६३३ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी सुमारे ३९ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, मोठ्या संख्येने अर्ज आल्याने भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे.
 
शारीरिक चाचण्या पोलिस मुख्यालय तसेच राज्य राखीव पोलिस दलाच्या गट क्रमांक दोनच्या मैदानावर पार पडणार आहेत. या भरतीत पोलिस अंमलदार, वाहनचालक आणि पोलिस बँडसमन अशा विविध पदांचा समावेश असून, राज्यभरात एकूण १६३३ पदांवर भरती केली जाणार आहे.
 
उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. शारीरिक चाचणीत उंची व छातीची मोजणी, १०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर) तसेच गोळाफेक या चाचण्यांचा समावेश आहे. शारीरिक चाचणीसाठी एकूण १०० गुण असून, किमान ५० गुण मिळवणे आवश्यक आहे.
 
भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी आरएफआयडी तंत्रज्ञान आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवले जाणार आहे.