मुंबईत ९ नोव्हेंबरला शासकीय सुट्टी जाहीर; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

    06-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असून, त्यामुळे संबंधित दिवशी शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत.

महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेने दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना गावी जाऊन सण साजरा करता यावा, यासाठी ९ नोव्हेंबरला सुट्टी देण्याची मागणी केली होती. ७ आणि ८ नोव्हेंबरला शनिवार-रविवारची सुट्टी, तर १० नोव्हेंबरला दिवाळी पाडवा आणि ११ नोव्हेंबरला भाऊबीजची सुट्टी आहे. अशा परिस्थितीत केवळ एका दिवसासाठी मुंबईत परतणे कर्मचाऱ्यांसाठी गैरसोयीचे ठरणार होते. या मागणीचा विचार करून शासनाने ९ नोव्हेंबरला स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

कोणती कार्यालये राहणार बंद?
या निर्णयानुसार मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील राज्य सरकारी तसेच निमशासकीय कार्यालये सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी बंद राहतील. मात्र, ही सुट्टी संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू नसून केवळ मुंबई शहर आणि उपनगरांपुरती मर्यादित आहे.