नागपूर जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; खलिस्तानी संघटनेच्या नावाने ई-मेलने खळबळ!

    03-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने सोमवारी दुपारी परिसरात खळबळ उडाली. खलिस्तानी संघटनेच्या नावाने न्यायालय प्रशासनाच्या अधिकृत ई-मेलवर धमकीचा संदेश पाठवण्यात आला. यामध्ये दुपारी ३.१५ वाजता स्फोट घडवण्याचा इशारा देण्यात आला होता.

या घटनेची माहिती मिळताच सदर पोलिसांसह बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि श्वान पथकाने न्यायालयात धाव घेतली. खबरदारी म्हणून न्यायाधीश, वकील आणि कर्मचाऱ्यांना इमारतीबाहेर काढण्यात आले. त्यानंतर संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली. सुमारे दोन तास चाललेल्या शोधमोहिमेत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

दरम्यान, यापूर्वीही नागपूर जिल्हा न्यायालयाला अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत. वारंवार येणाऱ्या धमकीच्या ई-मेलमुळे न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.