
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण तापले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासमोर नवी अडचण निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या विशेष संसदीय अधिवेशनाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. दोघेही प्रकृती अस्वास्थ्यामुळे अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयकाला शरद पवार यांनी पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने इंडिया आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत. काँग्रेसने या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली असून, राज्यसभेत जाण्यासाठी काँग्रेसनेच मदत केली असताना पवारांनी वेगळी भूमिका का घेतली, असा सवाल उपस्थित केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे विशेष अधिवेशनापूर्वीच पवारांच्या भूमिकेवरून राज्यातील राजकीय वादाला नवे वळण मिळाले आहे.