२०२५ मधील वादानंतर दमदार पुनरागमन; 'इंडियाज गॉट लेटेंट' आणि कॉमेडी स्पेशलमुळे पुन्हा चर्चेत

Image Source:(Internet)
मुंबई : कॉमेडियन आणि कंटेंट क्रिएटर समय रैना याने यूट्यूबच्या जगात नवा इतिहास रचला आहे. यूट्यूबवर १० लाख पेड सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करणारा तो जगातील पहिला क्रिएटर ठरला आहे. या विक्रमामुळे भारतीय डिजिटल क्रिएटर विश्वात त्याच्या नावाची विशेष चर्चा सुरू झाली आहे.
समय रैनाच्या यूट्यूब चॅनेलचे १२.४ दशलक्षांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. बुद्धिबळाचे लाइव्हस्ट्रीम, सेलिब्रिटींसोबतच्या गप्पा आणि 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमधून त्याने मोठा चाहतावर्ग निर्माण केला. २०२५ मध्ये झालेल्या वादानंतरही त्याने जोरदार पुनरागमन केले. 'स्टिल अलाइव्ह' या कॉमेडी स्पेशलसह 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या दुसऱ्या सीझनमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला. आता १० लाख पेड सबस्क्रायबर्सचा जागतिक विक्रम नोंदवत समयने भारतीय कंटेंट क्रिएटर्ससाठी नवा आदर्श निर्माण केला आहे.