
Image Source:(Internet)
पुणे : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात खून प्रकरणातील आरोपी मंदार मारुती किवळे जखमी झाला आहे. जुन्या हत्येच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
२० एप्रिल २०२५ रोजी कात्रज परिसरातील संतोषनगर येथे जमिनीच्या आणि आर्थिक वादातून शुभम सुभाष चव्हाण याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी मंदार किवळे चार दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. आज न्यायालयीन कामकाजासाठी तो शिवाजीनगर न्यायालयात आला असताना त्याच्यावर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.